आम्हीं कोल्हापुरी जगात भारी. दिलदार कोल्हापूरकरांचा माज म्हणजे त्यांनी धारण केलेल्या स्वाभिमानाचा मुकुट आहे- ना.प्रताप सरनाईक.

Kolhapur news
By -

 


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      आम्हीं कोल्हापुरी जगात भारी असं कोल्हापूर करांगबद्धल बोललं जातं.  दिलदारपणा आणि रांगडे पणा ही कोल्हापूर करांची ओळख आहे.त्यांचा अनोखा माज म्हणजे त्यांनी धारण केलेल्या स्वाभिमानाचा मुकुट आहे असे गौरव पूर्ण उद्गार महाराष्ट्राचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर नगरवासियांच्या बद्दल काढले. कोल्हापूर जिल्ह्यातील चार बस स्थानकांचे  उद्घाटन व लोकार्पण सोहळ्या कऱीता ते कोल्हापूर दौऱ्यावर होते.


  संयुक्त कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी राज्याचे आरोग्य मंत्री व कोल्हापूरचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर हे होते. या दौऱ्यात त्यांनी कोल्हापुरी मिसळचा पण स्वाद चाखला. कोल्हापूरच्या विविध आंदोलना बद्दल बोलताना ते म्हणाले कोणत्याही आंदोलनास कोल्हापूरकर स्वतःसज्ज असतात. भाडोत्री नेतेगिरी ची ते वाट पहात नाहीत.


   या दोऱ्यात त्यानी वाठार, पेठ वडगाव, जयसिंगपूर,छ. संभाजीनगर (कोल्हापूर ), नृसिंह वाडी येथील बस स्थानकांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या दौऱ्यात त्यांनी प्रवाशांच्या सेवेसाठी दोन महत्वाच्या घोषणा केल्या. एक जून पासून राज्या तील सर्व स्वच्छता गृहे (शौच्यालये ) मोफत असतील. तसेच  स्थानक कॅन्टीन मध्ये 30 रुपयात चहा नाष्टा मिळेल. तसे फलक कॅन्टीन समोर लावण्याची सक्ती असेल.


  परिवहन खात्याला लाभलेला सरनाईक टच लाल परीला मोठया उंचीवर नेईल असे पालक मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी  बोलून दाखवले.करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनाने मन तृप्त व प्रफुल्लित झाले असे त्यांच्या सर्व पथकांने  बोलून दाखवले.

            


       ------------------------------