कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गेल्या वर्षी उन्हाळा कडक होता, कधी नव्हे ते चटके बसत होते. यावर्षी त्याहून कडक उन्हाळा आहे. पुढील वर्षी यापेक्षा अधिक कडक उन्हाळा असेल. असा उन्हाळा प्रत्येक वर्षी अधिकाधिक तीव्र होत जाणार. उन्हाळा या ऋतूने पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये अतिक्रमण केलेले आहे. हिवाळा आणि पावसाळा पाच महिने आणि उन्हाळा सात महिने अशी सध्याची स्थिती आहे. उन्हाळा दिवसेंदिवस तीव्र होत जाणार. सभोवतालची, परिसरातील विविध कारणांसाठी बेछूटपणे वृक्षतोड सुरू आहे. अशीच वृक्षतोड सुरू राहिल्यास नजीकच्या काही वर्षांत वाढता तीव्र उन्हाळा आपल्या जीवावर उठेल. यावर एक उपाय आहे, जंगले, झाडं टिकवणे, संवर्धित करणे. आपल्या परिसरात जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे तिथे वृक्षारोपण करून ती रोपं जगवणं. मोठी वृक्ष तोंडणं टाळलच पाहिजे कारण असे वृक्ष पर्यावरण संवर्धनाचे पूर्ण क्षमतेने काम करत असतात.
एक झाड आपल्याला काय, काय देते....
- उन्हाची किरणे रोखते
- उन्हाची तीव्रता जाणवू देत नाही.
- सावली देते.
- गारवा देते.
- हवा शुद्ध करते.
- जमिनीत पाणी जिरवते.
- भुगर्भातील पाणी पातळी वाढवते.
- असंख्य किटक, पक्षी, प्राणी यांना आश्रय आणि अन्न देते.
- कीटक, पक्ष्यामार्फत परागीभवनास मदत करते.
- फळे देते.
- फुले देते.
- पीक उत्पादनासाठी, पीक वाढीसाठी मदत करते.
- जमिनीची धूप थांबवते.
- मृदा संवर्धन करते.
- जमीन सुपीक बनवते.
- आरोग्यदायी जीवन देते.
जैवविविधतेतील महत्त्वाचा घटक आहे झाड! एका झाडाचे पर्यावरणीय मूल्य ५० लाख, २५ हजार रूपये इतके आहे. एक झाड जगविणे म्हणजे आपण अनेक जीवांना जगवतो. हे जीव आपले उपकारही फेडतात. जर आपल्याला समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर झाडांशिवाय तरणोपाय नाही!
- प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर
वनस्पती संशोधक.
- भारतभूषण गिरी
पर्यावरण अभ्यासक, कार्यकर्ता.
----------------------------

