कोल्हापूर न्यूज नेटवर्क
Gen Z म्हणजे 14 ते 29वर्षे वयोगटातील पिढी. Ganeration Z असे गोंडस नाव या पिढीला दिले जाते.
शालेय पाठ ते करियर याच वयोगटात ही पिढी येते. याला युवा शक्ती असेही म्हणता येईल.या वयात मोबाईल साक्षरता शिगेला पोचलेली असते. मोबाईलने जग जवळ केलंय ना.!
सोशल मीडिया नावाच्या मैदानात या पिढीची दंगल 24×7 सुरु असते. रक्त थोडे गरम असल्याने उर्मी नावाचा घाम लगेच फुटतो.
Neet नावाच्या वस्तादाने यातील कांही पोरांना षड्डू मारायला शिकवले.नीट चा पहिलवान आपटला आणि सगळी पोरं घास्तावली.त्यांना काहीं सुचेना. सैर भैर झालेल्या या पोरांना एकदम अंगावर चढणारा एक झुरळ दिसला. आधी वाटलं झटकून टाकावा, चपलाने मारावा, आणि मेलेला झुरळ डस्ट बिन मध्ये टाकून द्यावा. म्युन्सिपालटीच्या कचरा गाडीतून लगोलग बाहेर जाईल. इतक्यात आणखी कांही झुरळे दिसली. एक झेंडा ही दिसला. त्यावर लिहिलं होतं CJP.
हे काय नवीन. पोरं आणखी चक्रावली. मागून एक घोषणा ऐकू आली. कोक्रोच जनता पार्टीचा विजय असो.
अरेच्या मारी. एवढी झुरळे आली कोठून. मुंग्यांची रांग पाहिली होती पण इथे झुरळांची रांग दिसते.या पार्टीचे हेड ऑफिस कुठे असेल.
अमेरिका. बोस्टन.!!
पार्टी भारताची. तीही राजकीय. मग. मुळे अमेरिकेत आणि फ़ांद्या भारतात असं कसं !.कांही तरी गडबड आहे.
इथं जमिनीवर त्यांना कोण विचारत नाही.
मग काय? झाडावर बसायचे. वांनरासारखे?
मोबाईलवर.
हां हां!म्हणजे करमणूक विभाग.
हो तसंच gen Z ला झुलवायला तेच एक माध्यम.
कुठंतरी गेसिंग चुकतंय. परवा दिल्लीत CJP चा मोर्चा झाला. मोर्चा कसला नुसती चर्चा. शिक्षण मंत्री राजीनामा द्या. Neet ची नीट चौकशी करा.
चौकशी तर एकदम जोरात सुरु आहे. राजीनामा मागणी पण जुनीच आहे. नवीन काय?
Neet वाली पोरं कुठे जंतर मंतर ला दिसली नाहीत.
कशी येतील. त्याना डॉक्टर व्हायचंय. करिअर करायचं आहे. जंतर मंतर वर सी सी टी व्ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग, आणि शेकड्याने माध्यम कॅमेरे व बाईट्स.हे सगळं करिअरला पाक रसातळाला घेऊन जाईल. गप्प घरात बसलेले बरे. JEE वाल्यांसारखे वर्क फ्रॉम होम.
अध्यक्ष कोण तो येईल.उन्हात कुणाच्या तरी खांदयावर बसेल. फिट आली की एसीत बसून राहील. आणि संध्याकाळच्या विमानाने बोस्टनला जाईल.त्याला पी एम व्हायचे आहे. आम्हांला फक्त डॉक्टर.
" बापरे! सगळं गौड बंगाल आहे."
बंगाल पेक्षा भयानक.
Gen Z ला खुप समज आहे. राष्ट्र आमच्या साठी आणि आम्हीं राष्ट्रासाठी. हे gen Z ने ओळखलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा संदेश दिलाय.
शिका, संघटित व्हा,संघर्ष करा.
राष्ट्र प्रथम हे लक्षात ठेवा.
सत्ता येतील जातील. सिंहासने बदलत रहातील. सिंहासनाचे चार पाय मात्र भारतीय जनतेचे असतील. त्यातला एक पाय gen Z चा ही असेल. कारण ही पोरं झुरळ नाहीत, भारत मातेचे वाघ आहेत. माता त्यांच्यावर आरुढ आहे.माता त्यांना कधीच झुरळ म्हणून झटकणार नाही.
-------------------------

