प्रामाणिकपणाचे चे दुसरे नाव पांडुरंग पेंटर. 80 हजार ची सोन्याची अंगठी मालकाना परत केली.

Kolhapur news
By -

 

              


            कोल्हापूर न्यूज नेटवर्क


  सद्या सर्वात जास्त मोल असलेला धातू म्हणजे सोने होय. कुटुंबाची आर्थिक स्थिती सोन्यावरून ठरते. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आर्थिक मूल्य त्या देशाकडे सोन्याचा साठा किती आहे यावर ठरत असते. 


   हे सांगण्याचा उद्देश एवढाच की  हातावर पोट असलेल्या पांडुरंग पेंटर ने रंगकाम करतांना सापडलेली 80 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी मालकाला परत केली. सोन्याचे मोल सुद्धा इथे फिके पडावे असा प्रामाणिक पणा पांडुरंग ने दाखवला. त्यांच्या या प्रामाणिक पणा बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.  पंधरा दिवसांपूर्वी हरवलेली अंगठी सापडताच मालकांनी सुद्धा त्याचा जाहीर सत्कार केला.


     पांडुरंग अनंत भांदीगरे हे आपल्या तीनचार सहकाऱ्या समवेत रणजित सुर्यवंशी यांच्या इमारतीचे रंगकाम करत होते.काम सुरु असतांनाच  एक चकचकित वस्तू त्यांना दिसली. ती नवी सोन्याची अंगठी होती. त्यांनी ती उचलली व सरळ घरमालक सुर्यवंशी यांच्या कडे सुपूर्द केली.


ती अंगठी त्यांच्या पत्नी ची होती व 15 दिवसापूर्वी घरकाम करतांना हरवली होती. दोन आठवडे अंगठीचा शोध सुरु होता. पांडुरंग पेंटर ने ती अंगठी जेंव्हा आणून दिली तेव्हा जणू पांडुरंग प्रसन्न झाला असे त्या कुटुंबाला वाटले. पुषहार घालून सहकारी मित्रासामवेत रणजित सूर्यवंशी यांनी त्याचा सत्कार केला व रोख बक्षीस सुद्धा दिले.


 पत्रकारांनी सुद्धा पांडू चे कौतुक करून 100 रुपयांचे बक्षीस दिले व सोन्याला सद्या किती महत्व. आहे याची जाणीव करून दिली.


  पांडुरंगने सांगितले की आपण आदमापूर च्या बाळूमामा मंदिर आणि मुरगूड येथील अध्यात्मिक केंद्र असलेले शिव गड यांचे ही रंगकाम केले आहे. ईश्वर कृपेने त्याच्या कुटुंबाला कसलीही पैशाची कमतरता भासली नाही. लोकांचा दुवा ही सुद्धा मोठी मिळकत आहे.


                      -------------------