कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी विशेष TET परीक्षेचे आयोजन करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथ शिक्षक सेवक समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे .
याबाबत त्यांना दिलेल्या निवेदनांत राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी म्हंटले आहे की, TET बाबत मा .सुप्रीम कोर्टाने दि 29 मे 2026 रोजी देशभरातील सर्व याचिका एकत्र करून आपला पूर्वीचाच निर्णय कायम ठेवला असून फक्त TET होण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे .
यापार्श्वभूमीवर तेलंगाना सरकारने दि 3जून 2026 रोजी निर्णय पारीत करून सेवेत कार्यरत (In-Service) शिक्षकांसाठी विशेष तेलंगाना शिक्षक पात्रता परीक्षा (Special TET) आयोजित करण्यास मंजुरी दिली आहे. वर्षातून नियमित दोन वेळा होणाऱ्या TET परीक्षांव्यतिरिक्त या विशेष परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यामुळे अनेक शिक्षकांना TET पात्रता प्राप्त करण्याची आणखी संधी उपलब्ध होणार आहे. तेलंगना सरकारचा हा निर्णय इतर राज्यांना मार्गदर्शक आहे .अशी आमची धारणा आहे .
महाराष्ट्रातही TET पात्रता, पदोन्नती व सेवा विषयक प्रश्नांवर चर्चा सुरू असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारनेही सेवेत कार्यरत शिक्षकांसाठी अशा विशेष TET परीक्षा आयोजित कराव्यात अशी सर्व शिक्षक बांधवांच्या कडून मागणी होत आहे .
म्हणून आम्ही या निवेदनाद्वारे आपल्याकडे मागणी करतो की , आपणही सर्व स्तरांतून होणाऱ्या या शिक्षक बांधवांच्या मागणीचा सहानूभूतीपूर्वक विचार करावा व सध्या सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी विशेष अशा TET परीक्षांचे आयोजन करावे अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे . तसेच ही निवेदने शिक्षण मंत्री दादा भुसे , शिक्षण सचिव देओल व शिक्षण आयुक्त एस . पी .सिंग यांनाही दिले आहे .
---------------------------

