कोल्हापूर न्यूज नेटवर्क
तंत्र व उच्च शिक्षण मंत्री ना.चंद्रकांत दादा पाटील यांचे कार्य प्रेरणादायक आहे असे उद्गार राजे समरजीत सिंह घाटगे यांनी मुरगूड येथील आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी काढले. या शिबिरात 560 रुग्णांची मोफत तपासणी करण्याt आली.
शाहू ग्रुप मार्फत वर्षातून अशी आरोग्य शिबिरे तालुक्यात व जिल्ह्यात विविध ठिकाणी भरवली जातात. ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून शाहू ग्रुप मार्फत मुरगुड येथील ग्रामीण रुग्णालयात असेच भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले होते. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
शिबिरात आकाश दीप अधायु, कोल्हापूर कॅन्सर सेंटर,संकल्प सिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ग्रामीण रुग्णालय मुरगूड येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले व आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
यावेळी राजे बँकेचे संचालक अमर चौगुले,प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अरुण पाटील, नगरसेवक विजय राजगिरे दिग्विजय पाटील,सरपंच सुहास मोरे,डॉक्टर प्रवीण कंदारे,अनंत फर्नांडिस. अनिल कदम,वसंत प्रभावळे,विशाल सूर्यवंशी, रणजीत सूर्यवंशी प्रवीण,चौगुले रामभाऊ खराडे,सदाशिव गोधडे,मयूर सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याचवेळी मुरगूडचे नगर परिषदेचे सेवानिवृत्त मुकादम बबन बारदेस्कर तसेच महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विशाल मडीलगेकर व मयूर भिके यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
राहुल खराडे यांनी स्वागत केले. राजे बँकेचे संचालक दत्तामामा खराडे यांनी प्रास्ताविक केले तर माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी आभार मानले.
-----------------------

