कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले
भैया म्हणजे आपले भैया उर्फ प्रताप माने साहेब. ना. हसन मुश्रीफ यांच्या राजकारणातले प्रमुख सेनानी. राजकारणातला एक वाक्यप्रचार नेहमी आम्हीं ऐकायचो. "राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कोणी कोणाचा शत्रू नसतो."
हा वाक्यप्रचार इतका घुमलाय की कोणीही अगदी डफली वाजवल्यासारखा वाजवतो. देवळात गेलं की घंटी वाजवल्याशिवाय देव जागा होत नाही असं वाटून आपण मोठ्यानं घंटी वाजवतो. तशातला हा प्रकार आहे.परवा शौमिका महाडिक वैनीनी सुद्धा हीच घंटा वाजवली. पुढे काय? आता त्या बसल्या जाऊन व्हाईट कव्हर घातलेल्या खुर्चीवर. बाकीचे त्यांच्या मागे बसले असतील लाकडी खुर्चीवर. "महा युतीचा विजय असो."असे म्हणत.
तुमच्या मोटारी समोर रस्त्याकडेला एक बोर्ड पाहिला. त्यावर बाण दाखवला होता. कागल कडे. राजकारणातल्या त्या डफली वाल्या वाक्याचा अर्थ आता खरा कळला.त्यात कांही दम आहे असं वाटलं. साहेबांसाठी तुम्हीं काय नाही केलं.! फक्त कमरेच धोतर तेव्हढं शिल्लक ठेवलं असेल. तुमच्या वडिलांनी स्व. मंडलिक साहेबांशी जन्मभर मैत्री केली. मैत्री च म्हणणे योग्य. ते काय साहेबांचे अनुयायी कार्यकर्ते, वगैरे नव्हते. शिक्षण क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा स्व. मंडलिक साहेबांनी तुमच्या वडिलांपासूनच घेतली होती. डझना हून अधिक शाळा, महाविद्यालय, इतर कोर्सेस ई. शिक्षण केंद्रे मंडलिक साहेबांनी काढली. दोघांमुळे हजारो. पदवीधर तयार झाले.दोघांचं अतूट नातं होतं.त्या मैत्रीत वरील वाक्य कधिच नव्हतं असो,तुमच्या या साहेबांनी मात्र एका दमात सांगून टाकले
" भैया आणि माझे राजकीय संबंध संपुष्टात आले."
आणि तेंव्हाच त्या डफली वाल्या वाक्याचा खरा अर्थ कळला. डफली चा ढोल झाला.तुमच्या साहेबांना युती धर्म तर पाळावा लागेलच.
पण अदृश्य शक्ती म्हणून तुमच्या पाठीशी रहावे लागेल असं कांही जण म्हणतात.शिवाजी विद्यापीठ तुमच्या मागे राहीलच पण पाच ही जिल्ह्यातील निष्ठावंतांची साथ तुम्हांला मिळायला कांही हरकत नाही. तुम्हाला दोन वेळा माघार घ्यायला लागली होती असं समजलं.पुरंदर च्या तहात राजेंनी सुद्धा माघार घेतली होती. आग्र्याहून सही सलामत सुटून आले.धैर्य आणि निर्धार त्यांचे कडून शिकायचे. महाराज हॆ कांही शिवाजी विद्यापीठा पुरते नव्हते. सारा महाराष्ट्र त्यांना दैवत मानतोय. मंदिराच्या नव्हे तर ह्रदयाच्या देव्हाऱ्यात त्यांना पूजतोय. हसन साहेबांनी माणसं मोठी केली.वहिनींना नागराध्यक्ष केले. उक्ती आणि कृति त कधी बदल केला नाही.युती धर्म आड आला.
पण कधी कधी हनुमानाला सुद्धा रामापासून दूर राहून काम कराव लागलं.भक्ती आणि शक्ती एकत्र आल्या की 'हनुमान अंश' सारखी अद्भुत कलाकृती जन्म घेते.
----------------------

