एम जे इंटरनॅशनल स्कूल चे तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत घवघवीत यश.

Kolhapur news
By -

 

                    


                      कोल्हापूर न्यूज नेटवर्क



मुरगुड येथील एम जे इंटरनॅशनल स्कूल च्या मुलींनी तालुका पातळी वरील 14 वर्षाखालील मैदानी खेळ स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे.


   जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्फत बिद्री येथील दूध साखर विद्यानिकेतन च्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मैदानी स्पर्धांमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थिनी याप्रमाणे.


  संस्कृती धनंजय पाटील 80 मीटर धावणे प्रथम क्रमांक आणि तिचाच उंच ऊडीत द्वितीय क्रमांक. आराध्या उमेश पाटील 80 मीटर अडथळा शर्यतीत द्वितीय क्रमांक. सानवी प्रकाश परीट 100 मीटर धावणे तृतीय क्रमांक.


या मुलींना करण मांगले, अर्कंच बारदेशकर व संकल्पा मगदूम यांचे मार्गदर्शन लाभले.


                -----------------------