सौ .शुभांगी कुंभार आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित

Kolhapur news
By -
सौ .शुभांगी कुंभार  आरोग्य भूषण पुरस्काराने सन्मानित

 कोल्हापूर न्यूज अणदूर / प्रतिनिधी - रघुनाथ दळवी

आनंदगंगा फौडेशन यांच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आरोग्य भूषण पुरस्कार  2022 गगनबावडा आरोग्य विभागातील निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सहाय्यिका सौ . शुभांगी अमर कुंभार यांना नुकताच सन्मनित करण्यात आला आहे .

 ' आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून  कोवीड लसीकरणा मध्ये विशेष
कामगिरी ,  सर्वांग सुंदर प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये  सक्रिय सहभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रसूती करणे, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्येक्रम सहभाग , पल्स पोलीओ लसीकरण मोहिम, 
 या त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्राथमिक
शिक्षक बॅकेच्या चेअरमन स्मिता डिग्रजे, शिक्षण उपसंचालक महेश चौथे, प्राचार्य विराट गिरी , राज्यध्यक्ष राजाराम वरुटे , विश्वस्त विनायक भोसले
 संस्थापक तानाजी पोवार , सौ . वासंती पोवार यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र , शिल्ड देऊन गौरविण्यात आले .
हा पुरस्कार वितरण सोहळा संजय घोडावत कॉलेजमध्ये संपन्न झाला.