न्यू इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
कोल्हापूर न्यूज नेटवर्क
जागतिक योगदिन मुरगूड येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला .
प्रारंभी प्राचार्या जसमीन जमादार यांनी सर्व मुलामुलींना योगदिनाचे तथा दैनंदिन योगाचे महत्व समजावून सांगितले .
भारतातील थोर योगमहर्षी पतंजली यांनी सुरू केलेली योग परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगातील 120 हुन अधिक देशात पोहचली .व 21 जून हा जागतिक योगदिन म्हणून निश्चित झाला .
शारीरिक आरोग्याशी योगशास्त्र निगडित असून असाध्य रोगांनाही रोखु शकेल अशी प्रतिकारशक्ति योगामुळे निर्माण होऊ शकते असे प्रतिपादन त्यांनी केले .
केजी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना योग शिक्षिका गीता जाधव ,सविता पोवार व किरण पाटील यांना प्रात्यक्षिके दाखवली व करवून घेतली .
**************************
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा.
By -
June 22, 2022
