कोल्हापूर न्यूज / अणदूर प्रतिनिधी , रघुनाथ दळवी
राज्यातील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्यात. गगनबावडा येतील जिल्हा परिषदेच्या परशुराम विद्यालयात आज नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी इयत्ता 5 वी ते 10 वी 120 विद्यार्थ्यांनी नवीन प्रवेश निश्चित केलेला आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमधे विद्यार्थी संख्या कमी होत असल्याने शिक्षकांना गावागावात फिरून विद्यार्थी गोळा करावे लागत आहे. मात्र परशुराम विद्यालयात विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी आर. व्ही . कांबळे व शाळा व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले आहे. आजच्या नवागतांच्या स्वागत व पाठय़पुस्तके वाटप कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुश्ताक वडगावे, समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य रंगराव गोसावी , समन्वयक आम्रपाली देवेकर , कुंडलिक जाधव , दिपक पाटील , सुरेश थोरात , अश्विनी पाटील ,स्वाती चौगले , सुप्रिया माळी , शितल पत्रावळे , वृषाली लोहकरे सर्व शिक्षक उपस्थित होते.
