कोल्हापूर न्यूज / शिवानंद वसेदार
निपाणी नगरपालिका वार्ड नंबर 20 शिंदे नगर मध्ये गेल्या एक वर्षापासून वसेदार गल्लीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती.
पिण्याच्या चाविचे पाणी फार बारीक येत होते त्यामुळे सर्वांना फार त्रास होत होता.
त्यानंतर त्या वार्ड चे नगरसेवक संतोष माने यांच्या प्रयत्नांमुळे आज त्याच चावी ला भरपूर प्रमाणामध्ये पाणी येत आहे. तसेच त्या गल्लीतील रस्त्याचे काम लवकरात लवकर करून देऊ असे संतोष माने याने सांगितले आहे.
