पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने वाळवा तहसीलदारांना निवेदन

Kolhapur news
By -
पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने वाळवा तहसीलदारांना निवेदन

        कोल्हापूर न्यूज नेटवर्क


इस्लामपूर:- वाळवा तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने तहसीलदार प्रतिक उबाळे यांना विविध मागण्यांचे निवेदन युवती  जिल्हाध्यक्षा सौ. वनिता सोनवले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.
सदर निवेदनामध्ये रेशन धारकानी  रेशन कार्ड काढले आहे त्यांना रेशन मिळत नाही त्यांना ताबडतोब रेशन द्यावे ,रेशन मिळण्याची ग्रामीण भागासाठीची 44 000/-हजाराची उत्पन्न मर्यादा रद्द करून ती एक लाख वीस हजार एवढी करावी, कोरोना काळातील मायक्रो फायनान्स कडील कर्ज माफ करून नॅशनल बँकेकडून महिलांच्यासाठी एक लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज देण्यात यावे.इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी वाळवा तालुका महिला आघाडीच्य अध्यक्षा लीलाताई सपकाळ, तालुकाध्यक्ष शिवाजी सकटे(सरपंच), तालुका उपाध्यक्ष संदीप माने, वाळवा तालुका उपाध्यक्षा रूपाली पेठकर, इस्लामपूर शहराध्यक्षा शहनाज जमादार,  रेखा साळुंखे, प्रज्ञा साळुंखे, छाया लोंढे,सुकेशनी साठे,सुशीला ठोंबरे इत्यादी पुरोगामी संघर्ष परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते