.ऋतुराज चौगले यांची तुरंबे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी पदी नियुक्ती

Kolhapur news
By -

             



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क

   

           मळगे बुद्रुक चे डॉ.ऋतुराज चौगले यांची तुरंबे येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी गट अ या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील ही सेवा मानली जाते.

    डॉ.ऋतुराज चौगले हे एम बी बी एस असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण इस्लामपूर येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च या संस्थेत झाले.

 तत्पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे तर शालेय शिक्षण न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, मुरगूड येथे झाले.

    त्यांचे वडील डॉक्टर असून गेली अनेक वर्षे ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करतात .आई गृहिणी आहे.

   अतिशय जिद्दीने ऋतुराज ने मिळविलेले हे यश कौतुकास्पद आहे.

    ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रेरणा दायी असलेल्या ऋतुराज च्या यशा बद्दल त्याच्या शाळेने सत्कार समारंभ आयोजित केला आहे.