कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नाट्यमय घडामोडीनंतर हेरले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत निलोफर इब्राहिम खतीब या ९ विरुद्ध १० मतांनी विजयी झाल्या.या निवडणुकीत सत्ताधारी जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील व बालेचाँद जमादार यांची सत्ता संपूष्टात आली तर माजी सभापती राजेश पाटील गटाची सरशी झाली.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सभापती राजेश पाटील गटाचे सरपंच पदासह ६ सदस्य निवडणून आले तर विरोधी आदगोंडा पाटील व बालेचाँद जमादार गटाचे ११सदस्य विजयी झाले.त्यामुळे सरपंच राजेश पाटील गटाचे तर उपसरपंच विरोधी आघाडी गटाचे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
उपसरपंच बक्तीयार जमादार यांनी गटांतर्गत ठरावामुळे राजीनामा दिला होता यावेळी उपसरपंच पदाची निवड बिनविरोध होईल अशी परिस्थिती असताना अचानक वंचित बहुजन आघाडीच्या दोघा सदस्यांनी सत्ताधारी गटाबरोबर काडीमोड घेत राजेश पाटील गटाला समर्थन दिले त्यानंतर नाट्यमय घडामोडीनंतर वंचित बहुजन आघाडीच्या निलोफर खतीब विरुद्ध सत्ताधारी गटाचे अर्जुन पाटील यांच्यात सरळ लढत झाली.सरपंच राहुल शेटे यांनी आपले विशेष मत निलोफर खतीब यांना दिले. यामुळे निलोफर खतीब या ९ विरुद्ध १० अशा १ मताने विजयी झाल्याची घोषणा सभेचे अध्यक्ष सरपंच राहुल शेटे यांनी केली.
यावेळी विजयी उमेदवारांचे अभिनंदन लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे,गटनेते माजी सभापती राजेश पाटील,हिरालाल कुरणे,उदय वडड,तंटामुक्ती अध्यक्ष अमर वडड,अशोक मुंडे ,मुनिर जमादार,गुरुनाथ नाईक,कपिल भोसले,शशिकांत पाटील,इब्राहिम खतीब,ग्रामविकास अधिकारी बी.एस.कांबळे यांनी केले. स्वाभीमानी शेतकरी गावविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करून गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य,हिरालाल कुरणे,मनोज पाटील,वनीता खाबडे,रंजना माने,विजय भोसले,गीतांजली चौगुले,राकेश जाधव,बानू खतीब ,सुशिला परमाज,अर्जुन पाटील,अमिन बारगीर,शुभांगी चौगुले,बख्तियार जमादार,सविता पाटील,अमित पाटील,ऊर्मिला कुरणे ग्रामविकास अधिकारी बी.एस.कांबळे उपस्थित होते.
*************************************
हेरले गावामध्ये स्थानिक वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आणि ग्रामपंचायतीच्या १९२७ च्या स्थापने पासून पहिली महिला उपसरपंच करण्याचे आमच्या आघाडीस भाग्य मिळाले.
- माजी सभापती राजेश पाटील
*************************************

