कोल्हापूर न्यूज नेटवर्क
तब्बल ४६ वर्षे झाली आपण शाळा सोडून नाही कारे ? अजून त्या आठवणी जात नाहीत .सावंत सरांची ती शिस्त,ते रागावणे, पुन्हा पाठीवर हात ठेवून समजावणं,ते व्हॉलीबॉल चे ड्रॉप वर ड्रॉप .
सारं आठवतंय रे.
जावुया कारे एकदा शाळेत ?
आपण आता स्थिर झालोय .मुलांचे बाप झालोय .
शाळा मात्र विसरत नाही.
मुरगूड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज च्या माजी विद्यार्थ्यांच्या पारावरच्या या गप्पा.
गप्पांचे रूपांतर चर्चेत व चर्चेचे रुपांतर प्रत्यक्ष कार्यक्रमात करायचे ठरले.
सावंत सर ना बोलावून आणायचे.
येतील का ?
त्यांनी पंच्याहत्तरी ओलांडलीय .ऑपरेशन ही झालंय.
मनात शंका धरून पोरं कोल्हापूरला सरांच्या बंगल्यावर गेली.
पोरांना बघून सर खुर्चीतून उठून उभे राहिले.एक हात उंचावत पुढे सरकले.
"सर ,ड्रॉप मारताय का शाब्बासकी देताय ! "
एकट्याचे हे उद्गार ऐकून हास्याचे जोरदार फवारे उडाले.
आता ठरलं.
जवळ जवळ अर्धशतकाडे झुकलेल्या आठवणी ताज्या टवटवीत झाल्या.
मुरगूड हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या या विद्यार्थ्यांनी नुकताच हा स्नेह मेळावा घेतला.
आयुष्यात नेहमी सकारात्मकता ठेवा असा संदेश त्यांनी मुलांना दिला.प्रत्येकाने आपल्या आठवणी आणि सद्याची सांसारिक परिस्थिती यांचा आढावा घेतला.
ब्लॅक व्हाईट वातावरण एकदम कलरफुल झाले.
सगळे हे माजी विद्यार्थी सधन व सुस्थितीत असल्याने कार्यक्रमाचे आयोजन आदमापुर येथील एका सभागृहात करण्यात आले होते.विद्यमान प्राचार्य एस.आर.पाटील अध्यक्ष स्थानी होते.शिवराज हायस्कूल चे माजी प्राचार्य महादेव कानकेकर हे सुध्दा या माजी विद्यार्थ्यांत होते.ते ही उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू होते.इतर उपस्थित मान्यवर या प्रमाणे.
मनोरमा भोसले,शशिकांत गुळवणी,पी.एल.पाटील ,तानाजी पाटील,रंगराव व्हटकर ,रघुनाथ परीट,मारुती हळदकर,दिगंबर बोरगावे,सुनील पिराले,एम. जे.गुरव,बी जी.देसाई.
एका विद्यार्थ्याने गीत गायले
अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवुनी जाती.

