कोल्हापूर जिल्हा परिषदेचा “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा व जल जीवन मिशन अंतर्गत स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. ९ मार्चला होणार

Kolhapur news
By -

               कोल्हापूर न्यूज नेटवर्क



कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक) व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 
  “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा व जल जीवन मिशन अंतर्गत स्पर्धांचा पुरस्कार वितरण व सत्कार सोहळा सन २०२३-२४ शनिवार दि.९ मार्चला सकाळी ११.०० वाजता जय पॅलेस सभागृह,कळंबा, गारगोटी रोड, कोल्हापूर येथे होणार आहे . 

पुरस्कार वितरण सोहळा पालकमंत्री ना हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक ,खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने , राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबीटकर यांची उपस्थिती असणार आहे .