पोलिस निरीक्षक अनिल देवळे यांचा सत्कार

Kolhapur news
By -

               


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मुरगूड चे अनिल अशोक देवळे यांची पोलिस निरिक्षकपदी पदोन्नती झालेबद्दल राणा प्रताप व्हॉलीबॉल क्लब च्या वतीने सत्कार करण्यात आला.अध्यक्ष स्थानी प्रशिक्षक महादेव कान केकर होते.

  राष्ट्रीय खेळाडू अजित गोधडे, करण मांगले,अमित साळोखे,सुहास भारमल,ओंकार लोकरे,या सर्वांनी अनिल देवळे यांना शुभेच्छा दिल्या .

  अनिल देवळे हे पट्टीचे व्हॉलीबॉल खेळाडू असलेने त्यांनी पोलिस सेवेत किंवा कोणत्याही शासकीय सेवेत खेळाचे अनन्य साधारण महत्व असते हे सांगितले.खेळामुळे अंगी शिस्त येते व जीवनाला चांगले वळण लागते.

  प्रमुख उपस्थितात संभाजी मांगले,जनार्दन भाट,हर्षद चौगले ,रणजित मोहिते,ओंकार चौगले,श्रावण कलांद्रे, करण भोसले,अजित गुरव,सागर पाटील,सुनील साळोखे,तानाजी डोंगरे,निखिल सावंत इत्यादींचा समावेश होता.

विनोद रनवरे यांनी  आभार मानले.