कोल्हापूर न्यूज / वि .रा.भोसले
कोल्हापूर मतदार संघात काँग्रेसचे शाहू महाराज व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात मुख्य लढत होणार असे चित्र आहे.
काँग्रेसला माजी पालकमंत्री सतेज पाटील यांचा तर शिवसेनेला विद्यमान पालकमंत्री ना.हसन मुश्रीफ यांचा पाठिंबा आहे.
शनिवारी पंतप्रधान मोदींची जंगी सभा झाली.त्यामुळे शिवसेनेच्या गोठात उत्साहाचे वातावरण आहे. मान गादीला मत मोदींना ही टॅग लाईन सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
काँग्रेसमध्ये त्यामुळे थोडी अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे.
कोल्हापूर शहरातील दोन्ही आमदार काँग्रेसचे आहेत .करवीर मध्ये आमदार पी एन पाटील बाजू सांभाळत आहेत.
राहिलेल्या तीन विधान सभा मतदार संघात राष्ट्रवादी व शिवसेनेचे पारडे जड आहे.
आम .सतेज पाटील पाटील व ना.हसन मुश्रीफ यांनी दोघांनी ही निवडणुका स्वतःच्या प्रतिष्ठेची बनविली आहे.
सतेज पाटील म्हणतात रात्रीचे सतर्क रहा ,रात्री बाराला सुध्दा मला फोन करा मी काठी घेऊन हजर राहीन.
हसन मुश्रीफ यांचा भर गाठी भेटीवर जास्त आहे.दररोजचा गाव वार दौरा ठरलेला आहे.त्याचे वेळापत्रक ठरले आहे.कार्यकर्ते पहाटे पाच पासून कामाला सुरुवात करतात.
ना.मुश्रीफ यांची भाषाशैली विनयशील असते.प्रत्येक मतदार संघातील भरीव विकास कामे मतदारांना साद घालतात .त्यावर काँग्रेस ला कांहीं आक्षेप घेता येत नाहीत, खा.संजय मंडलिक यांना ते घेरण्याचा प्रयत्न करतात. त्यांची विकासकामे कोठे आहेत म्हणून विचारतात .
यावर शिवसेनेचे कार्यकर्ते यादीच सादर करतात.
खासदारकीचा मतदार संघ खूपच मोठा असतो.शेकडो गावे असतात.गावोगावी किंवा घरोघरी आतापर्यंत कोणताच खासदार पोचू शकला नाही.उदयसिंगराव गायकवाड,बाळासाहेब मने ,निवेदिता माने,कल्लाप्पाण्णा आवाडे यांनाही कधी घरोघरी संपर्क ठेवता आला नाही.
केंद्रीय निधी आणण्यात मात्र ते कोठे कमी पडले नाहीत.
काँग्रेस चे उमेदवार शाहू महाराज यांना भाषण करता येत नाही म्हणून त्यांच्या वतीने इतर वक्ते बाजू मांडत असतात.
छ्त्रपती उभे आहेत .कोल्हापूरच्या गादीचे ते वारस आहेत.
त्यांना मत म्हणजे गादीला मत.असा प्रचार करताना दिसतात.
शिवसेनेनेच्या वतीने प्रिन्सेस पद्माराजे यांचे चिरंजीव राजवर्धन कदमबांडे यांना पाचारण केले.पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की राजर्षी शाहूंच्या रक्तमासाचा खरा वारस मीच आहे. बाकीचा न्यायालयीन वाद सुरू आहे.
कोल्हापुरात संभ्रम निर्माण झाला आहे.
मान गादीला व मत मोदींना या टॅग कडे लोक झुकू लागले आहेत असे शिवसेनेचे कार्यकर्ते बोलत आहेत.
सतेज पाटील यांच्या जोडीला आम जयश्री जाधव,ऋतुराज पाटील व पी एन पाटील आहेत.त्यांचे वक्तृत्व तसे बेताचे आहे.ना.मुश्रीफ यांच्या साखळीत खा.धनंजय महाडिक,अमल महाडिक, शौमिका महाडिक ,समरजीतसिंह घाटगे,अम.प्रकाश आबिटकर ,के.पी.पाटील, आम .राजेश पाटील आणि स्वतः उमेदवार खा. प्रा.संजय मंडलिक हे सारे खंदे वक्ते आहेत.
सोशल मीडियावर गाणी ,घोषणा,मिमस अशा प्रचारात सुध्दा मंडलिक आघाडीवर दिसतात.
गोकुळ मध्ये एकत्र असलेले एकमेकांचे विरोधक बनून कामाला लागलेत.कागलचा स्वाभिमान अशी आपली ओळख सांगणारे संजय घाटगे विकासावर कमी बोलतात ,अबकी बार मोदी हद्दपार अशी भाषा पंतप्रधान पदाबद्दल वापरतात.
कुठला स्वाभिमान ! तो केंव्हाच समाधीत गेलाय अशी टीका त्यांच्यावर मंडलिक समर्थक करताना दिसतात.
ना.हसन मुश्रीफ यांनी मात्र आपल्या मंत्रिपदाचा आब राखत सर्वांना घेऊन ही लढाई स्वतःच्या प्रतिष्ठेची बनवलेली दिसते.
सतेज पाटील यांचा भर मतदारांना गादीसाठी मतदान करण्यास प्रवृत्त करणे यावर अधिक आहे.
कोल्हापूरची जनता म्हणजे विचार आणि कृती यांची सांगड घालणारी एक मिसाल जनशक्ती आहे असे मानले जाते.
तीच याचा निर्णय करेल.

