"बुद्धीबळ खेळताना आव्हान स्विकारण्याची सवय झाली. त्यामुळे मला परिक्षेचा ताण कधीच आला नाही" -१२ वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन राज्यात प्रथम आलेल्या मनीषाची प्रतिक्रिया

Kolhapur news
By -

 

                  


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     "बुद्धीबळ खेळताना आव्हाने स्विकारण्याची सवय झाली. त्यामुळे मला परीक्षेचा ताण कधीच आला नाही. परिक्षेपेक्षा मला मॅचेसचा ताण अधिक यायचा. त्यामुळे माझा परफॉर्मन्स जास्त चांगला होत गेला" ही प्रतिक्रिया आहे शंभर टक्के गुण मिळवून राज्यात बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या तनीषा बोरामणीकरची  . तनीषा ही बुद्धीबळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. आत्तापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय मॅचेस  तिने खेळलेल्या आहेत. दहावी बोर्डाच्या परीक्षेतही तिने ९८.२ टक्के  मिळवले होते . 

       परीक्षेच्या  दाेन महिने आधीपासून अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी मी अभ्यास करायचा म्हणून केला नाही तर एन्जॉय करत अभ्यास केला. मला सगळ्यांना हेच सांगायचे आहे कि, कुठल्याही दबावाखाली अभ्यास करु नका. सगळं समजून घेत अभ्यास करा. बुद्धीबळ खेळताना आव्हान स्विकारण्याची सवय झाली. त्यामुळे मला परिक्षेचा ताण कधी आलाच नाही. परीक्षेपेक्षा मला मॅचेसचा ताण अधिक यायचा. त्यामुळे माझा परफॉर्मन्स जास्त चांगला झाला असे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना तिने सांगितले . ती छत्रपती संभाजीनगरची आहे.