मुंबई : सर्वच मतदान जुमलेबाजीला त्रासलेत. त्यामुळे ते देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क यापुढेही अबाधित रहावा यासाठी मतदान करत आहेत. लोक पैशाचा पाऊस स्वीकारणार नाहीत. कुणीही पैसे घेऊन आपले आयुष्य विकण्यास तयार नाहीत, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. मुंबईसह इतर सर्व ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी बोलताना केले. शेवटच्या टप्प्यातील झालेल्या मतदानाच्या वेळी सहकुटुंब मतदान केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते

