पेन्शन क्रांती महामोर्चात खाजगी शाळांतील सर्वानी सहभागी व्हावे...

Kolhapur news
By -

 

             


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात जिल्ह्यातील खाजगी शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी  केलेले आहे .

भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सर्व शिक्षक आणि  सरकारी - निम सरकारी कर्मचारी  यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे . महाराष्ट्र शासन सुधारित पेन्शन योजनेच्या नावाखाली फसवी पेन्शन योजना सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्यावर माथी मारु इच्छित आहे . हे आम्हा शिक्षक - कर्मचाऱ्यांना सगळ्यांना मंजूर नाही .1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू व्हावी म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून राज्यभरामध्ये आणि देशभरामध्ये अनेक वेळा आंदोलने झालेली आहेत .पण शासन याची दखल घेत नाही .त्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष आहे . हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि 1982 ची जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू होण्यासाठी शनिवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी पेन्शन क्रांती महामोर्चा काढणार आहे . हा महामोर्चा संग्राम उद्यान टाऊन हॉल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा असणार आहे . तेव्हा जिल्ह्यातील खाजगी शाळातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळा सुटल्यानंतर शंभर टक्के या मोर्चामध्ये सहभागी व्हावे आणि आपल्या ज्वलंत प्रश्न साठी  ठाम उभे रहाव असे आवाहन भरत रसाळे यांनी केले आहे .