राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली जाहीर माफी

Kolhapur news
By -

 



           



 मुंबई : पंतप्रधान झाल्यावर मी पहिल्यांदा शिवरायांचे आशीर्वाद घेतले. जे जे लोकं शिवरायांना मानतात, त्यांची पूजा करतात अशा प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे   राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे जाहीर माफी मागितली. 

  

   राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी जाहीर माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.


  वाढवण बंदरा विषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वाढवण बंदराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे बंदर देशातील प्रमुख बंदरापैकी एक बंदर असणार आहे. या प्रकल्पामुळे १२ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. काही जण महाराष्ट्राला मागे खेचू पाहत आहे. मात्र, महासयुतीचे सरकार महाराष्ट्राला सर्वांत पुढे घेऊन जाऊ इच्छितात. आधीच्या सरकारने बंदराचे काम पूर्ण करु दिले नाही, असे म्हणत मविआ सरकारवर हल्लाबोल केला आहे. २०१४ मध्ये ८० लाख टन मासे उत्पादन होते तर आत १७० लाख टन उत्पादन होते. यासह निर्यातीमध्येही आपण दुपट्टीने वाढ केली आहे.