कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
भारतीय सेनादलातील जवानांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रभक्तीपर गीते सामुदायिक रित्या गाऊन संदीप कोले व मगदूम या जवानांचा गौरव करण्यात आला.
राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत (एन.एस.एस.ई) राज्य व जिल्हा पातळीवर गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाण पत्रे वितरीत करण्यात आली
सामाजिक सेवेत सतत कार्यरत असलेल्या सर्जेराव भाट व ओंकार पोतदार या शिवभक्त स्वयंसेवकांचा विद्यार्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .


