नानीबाई चिखलीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

Kolhapur news
By -

     


                     कोल्हापूर न्यूज नेटवर्क


नानीबाई चिखली येथील स्वातंत्र्य दिनाचा सोहळा शेतकरी दूध संस्थेसमोर सोमवार पेठेमध्ये उत्साहात पार पडला. सरपंच युवराज कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी  जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती शिवानी भोसले , अजय भोसले ,उपसरपंच कुमार संकपाळ, ग्रामपंचायत सदस्य , ग्रामविकास अधिकारी ,शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, विद्यार्थी ,शेतकरी दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब काटकर , उपाध्यक्ष  महादेव संकपाळ, संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . 

---------------------------------------------------

          


चावडी कार्यालयातील ध्वजारोहण बिद्री साखर कारखाना  माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी तलाठी नितीन पाटील यांचा कागल तालुका आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल बापूसाहेब भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

--------------------------------------



हुतात्मा स्मारकामध्ये वीरपत्नी आकुबाई मुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले , यावेळी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी  जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिवानी भोसले, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

--------------------------------------------



     आजी-माजी सैनिक असोसिएशनच्या वतीने सैनिक दूध संस्थेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले .यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सैनिक दूध संस्थेचे चेअरमन,व्हा चेअरमन ,संचालक मंडळ व सर्व आजी-माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी चिखलीचे तलाठी नितीन पाटील यांना कागल तालुक्यातील आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल आजी-माजी सैनिक असोसिएशन व सैनिक दूध संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला . 

------------------------------------------------

         


चिखली इंग्लिश स्कूल चिखली मध्ये संचालक धीरज मगदूम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य व  वेदगंगा सेवा संस्थेचे अध्यक्ष सदाशिव तुकान ,मुख्याध्यापक एस एस बोरवडेकर ,माजी मुख्याध्यापक एस एस मगदूम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 


--------------------------------------------



   सैनिक इंग्लीश स्कूल चिखली येथे  तरुण उद्योजक राम रानगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला . यावेळी मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते . 

 



----------------------------------------------------


   Chikhali  Independence Day  2024    

                   (  Video by Mayur ) 

---------------------------------------------------------