बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर

Kolhapur news
By -

 


            


   मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. आज बदलापूर पोलिसांचे पथक त्याचा ताबा घेऊन पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याने पोलिसांकडून बंदूक घेऊन पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.

आरोपी अक्षय शिंदेसोबतच पोलिस अधिकाऱ्यालाही गोळी लागली आहे. 
 . 

 आज बदलापूर पोलिस तळोजा कारागृहात आरोपी शिंदेला त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या नव्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी गेले होते. सायंकाळी साडेसहा वाजता पोलिस मुंब्रा बायपासजवळ आले असता शिंदे याने एका हवालदाराकडून शस्त्र हिसकावले आणि एका अधिकाऱ्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरात, दुसऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यावर  गोळीबार केला आणि तो गंभीर जखमी झाला आणि  त्याचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या अधिकाऱ्यांनाही  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.