कोल्हापूर न्यूज नेटवर्क
समरजितसिंह घाटगे यांनी कागलच्या गैबी चौकातील कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर या पक्षप्रवेशावर बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी माझ्या सारख्या अल्पसंख्याक सामान्य कार्यकर्त्याच्या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि जयंत पाटील हे का लागले आहेत? याचे मला आश्चर्य वाटते असे म्हटले होते.
नामदार मुश्रीफ यांनी आश्चर्य व्यक्त केल्यानंतर समरजितसिंह घाटगे यांनी ही प्रत्युत्तर दिले आहे. मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाच टार्गेट केले असून सर्वकाही दिलेल्या नेत्यांवरच मुश्रीफ यांनी जातीवाचक आरोप केला आहे .त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही असे समरजितसिंह घाटगे यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे .
पवार साहेबांशी वैर नाही...परंतु, समरजीत यांची खैर नाही......!
या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या इशाऱ्यावर बोलताना समरजीतसिंह घाटगे म्हणाले, "माझ्या मतदारसंघातील जनता आणि शरद पवार माझ्या पाठीशी असताना मी या गोष्टीला घाबरत नाही.

