पुरोगामी संघर्ष परिषदेचे सोमवारी माढा तहसील समोर अमरण उपोषण

Kolhapur news
By -

 

             


     

माढा- माढा तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने  तालुक्यातील प्रत्येक गावात तसेच अंजनगाव मधील मातंग समाज व इतर समाज राहत असलेल्या ठिकाणी गेली 30 वर्षेे वास्तव्य असून सदर कुटुंबांना घरकुल योजनेतून घरे मंजूर झाली असून सदर गायरान जागा दाखवून  ग्रामपंचायत त्या ठिकाणी घरकुल बांधकाम परवाना देत नसून शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने लेखी परवाना द्यावा तसेच सदर जागेच्या वास्तव्याचा विचार करून ८ अ चा मालकी हक्काचा दाखला द्यावा या व अशा अनेक मागणीसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर समोर समोर दिनांक 30 सप्टेंबर रोजी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने माढा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती माढा वरिष्ठ तालुकाध्यक्ष संभाजी भडकवाड व माढा  युवक तालुकाध्यक्ष योगेश पाटोळे यांनी माढ्याचे पोलीस निरीक्षक व माढा तहसील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


सदर आंदोलनात सोलापूर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष शंकर कांबळे,सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष उमेश वाघमारे, सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी देवकते,बार्शी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा मायाताई जाधव, नितीन भडकवाड, अमोल गायकवाड, रोहित गावडे, कुणाल नाईकनवरे, बिरुदेव नाईक, महादेव शिंदे, छगन गायकवाड, महादेव भडकवाड हनुमंत नाईकनवरे इत्यादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार असून, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख कृष्णाजी गायकवाड, राज्य प्रवक्ता पांडुरंग रणदिवे, राज्य प्रसिद्धीप्रमुख पांडुरंग ऐवळे, राज्य उपाध्यक्ष नेताजी अवघडे, महिला आघाडीच्या राज्य कार्याध्यक्षा  वनिता पवार, राज्य संपर्कप्रमुख मधुकर चव्हाण पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश पाटोळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी भेटी देऊन आंदोलन यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणार आहेत.

----------------------------------------------