कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महामानवांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमातून महामानवांच्या विचारांचा जागर होतो व युवकांना दिशा मिळते असे प्रतिपादन इचलकरंजीच्या नाकोडा हायस्कूलचे मुख्याध्यापक विनायक सपाटे यांनी केले.
हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ज्युनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले जागर महामानवांच्या विचारांचा या विशेष भित्तीपत्रकाचे अनावरण मुख्याध्यापक श्री.सपाटे यांच्याहस्ते झाले भित्तिपत्रकात विशेष रेखाटन केल्याबद्दल कु.सिद्धी परीट हिचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.कु. गिरीजा कुंभार,कु.अस्मिता कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.डॉ.मोहन सावंत यांचे भाषण झाले.
यावेळी प्रा.डॉ.बालाजी कांबळे प्रा.डॉ. समीर गायकवाड,प्रा.दिनकर पाटील,प्रा. मनीष साळुंखे,प्रा.रॉबर्ट बारदेस्कर,प्रा.वैशाली हावळे,प्रा.हेमांगी वडेर आदी उपस्थित होते. प्रा.सुनीता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.रवींद्र पडवळे यांनी आभार मानले.
-----------------------------