भाजपची पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर कोल्हापूर जिल्ह्यातील दोघांना उमेदवारी

Kolhapur news
By -

 


     


        

        मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आता खऱ्या अर्थानं वाजलं आहे. कारण भाजपने आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यादीमध्ये कोल्हापूर दक्षिणमधून माजी आमदार अमल महाडिक, तर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे


नव्यांना संधी देताना काही जणांची तिकीटही कापण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आल्याचंही दिसत आहे. भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर कामाठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस

कामठी -चंद्रशेखर बावनकुळे

कोथरूड  - चंद्रकांत पाटील

कणकवली  - नितेश राणे

कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक

इचलकरंजी – राहुल आवाडे

सांगली      -  सुधीर गाडगीळ

 मिरज        -  सुरेश खाडे 

यांच्यासह इतरांचा समावेश आहे


           ----------------------------