मुरगूड शिवतीर्थावर म.गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

Kolhapur news
By -

 

       



                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणात शिवतीर्थावर म.गांधी व भारताचे द्वितीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शिवभक्त स्वयंसेवक यांनी मुरगूड मधील पत्रकारांनाही या समारंभास निमंत्रित केले होते.दोन्ही प्रतिमेचे पूजन करून पत्रकारांच्या वतीने पुष्पहार घालण्यात आले.

  

ज्येष्ठ पत्रकार वि.रा. भोसले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की , या दोन महापुरुषांच्या चरित्र व इतिहासाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे .जय जवान जय किसान व क्विट इंडिया या घोषणांचा अर्थ नव्या पिढीला कळविण्याचे कार्य पत्रकारितेतून व्हावे.पत्रकार अविनाश  चौगुले यांनी दोन्ही महा पुरूषांच्या चरित्राची ओळख करून दिली.त्यांचा त्याग आणि राष्ट्रभक्ति यातून देशाला वेगळी प्रेरणा मिळाली आहे.पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील डेळेकर  यांनी शिवभक्तांच्या जागृकतेबद्दल कौतुक केले व अशा सर्व विधायक कार्याला पत्रकारांचा पाठिंबा राहील असे सांगितले.या निमित्ताने मुरगूड मधील एका बेघर कुटुंबाला आसरा निर्माण करून देण्याचे ठरले.


उपस्थितांमध्ये पत्रकार रविंद्र शिंदे,प्रवीण सुर्यवंशी ,दिलीप निकम,राजू चव्हाण,संदीप सुर्यवंशी,तसेच शिवभक्त सर्जेराव भाट,सोमनाथ यारनाळकर,तानाजी भराडे ,प्रकाश पारिष्वाड ,जगदीश गुरव,पांडुरंग मगदूम,शशिकांत मेंडके,विशाल कापडे,अमर इंदलकर,आकाश भाट,गणेश भाट,इत्यादींचा समावेश होता.

    पत्रकार ओंकार पोतदार यांनी आभार मानले.


----------------------------------------------