कोल्हापूर न्यूज नेटवर्क
सकाळी सहाची वेळ. मुरगूड च्या अंबाबाई मंदिरात देवीची आरती सुरू आहे.परिसर भाविकांनी तुडुंब भरलेला .काकडा आला,तीर्थ आले.तीर्थ प्राशन करून डोक्यावरुन हात फिरवले आणि आई अंबाबाईच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
लगोलग सुरू झाली दुर्गा दौड .धर्म आणि देश भावना जागृत करणाऱ्या दुर्गा दौड चे भगिनींनी जागोजागी भावपूर्ण स्वागत केले. पाण्याचे कलश पायावर रिकामे केले. आरत्या ओवाळल्या , कुंकुम तिलकांची देवाण घेवाण झाली. जोशपूर्ण धर्म भक्तीची गाणी ऐकली.
"वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. "
भारत माता की जय.छ्त्रपती शिवाजी महाराज की जय.
धर्म आणि देश भावना जागृत करणारी ही दौड देवीच्या द्वारातून सुरू झाली.गाव तलाव,मारुती मंदिर, प्रजा पिता ब्रम्हा कुमारी विश्वविद्यालय केंद्र, ज्ञानेश्वर कॉलनी,पाटील नगर,बस स्थानक,नगरपरिषद , गणेश मंदिर,मार्गे बाजार पेठेत आली.जागोजागी भावपूर्ण स्वागत झाले.
नवरात्राच्या ७ व्या दिवशी महिलांनी जांभळी साडी परिधान केली होती. त्यामुळे वातावरणात एकात्मिक छटा ही दिसून आली.
दुर्गा दौड कार्यक्रम यशस्वी झाल्याचा आनंद हिंदुत्व वादी संघटकांच्या चेहेऱ्यावर दिसून आला.
------------------------------------------------



