मुंबई : अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक चिन्ह असलेले घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नावाबाबत शरद पवार गटाने दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमदेवार घड्याळ याच निवडणूक चिन्हावर विधानसभेला सामोरे जातील.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल न्यायालयाने द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे तथा शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र आता आचारसंहिता लागल्यामुळे याबाबत शरद पवार गट अधिक आक्रमक झाला होता. निवडणुका जाहीर झाल्या तरी अद्याप या प्रकरणाचा निकाल समोर आला नव्हता. या प्रकरणाचा निकाल आता आला आहे. यात अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला असून शरद पवार गटाची याचिका फेटाळण्यात आली आहे.
-------------------------------

