शयनकक्ष म्हणजे शांतता, विश्रांती आणि झोप. या खोलीत जगाची गडबड नाही, ऑफिसची धडपड नाही, टीव्हीचा आवाज नाही. दिवसभराच्या कामानंतर थकल्यासारखे आणि दमून तिथे गेल्यावर तुम्हाला आराम वाटतो. त्या जागेशी एक प्रकारची शांतता आणि आराम निगडीत आहे.कोणत्याही जिव्हाळ्याच्या नात्यासाठी ही जागा खूप महत्त्वाची असते. पण झोपण्याच्या वेळेच्या अनेक सवयी आपल्या नात्यात संबंध जोडण्याऐवजी अंतर निर्माण करतात.
जर तुम्हालाही तुमच्या नात्यात काहीतरी कमी आहे असे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या झोपण्याच्या सवयींचा विचार करणे आवश्यक आहे कारण त्यांचा तुमच्या नातेसंबंधावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. या अशा सवयी आहेत ज्या नात्यातील गोडवा नष्ट करतात.
अमेरिकेच्या बेलर युनिव्हर्सिटीने पती-पत्नी मधील नात्यांचा एक अभ्यास केला. या अभ्यासात, 70% लोकांनी कबूल केले की मोबाइल फोन 'अनेकदा' त्यांच्या संभाषणात अडथळा बनतो.
कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की झोपेच्या कमतरतेमुळे थकलेल्या पती-पत्नीला एकमेकांना महत्त्व देणे कठीण होऊ शकते. त्यासाठी समुपदेशकांनी पती-पत्नी यांनी खालील गोष्टींची काळजी घ्यावी असे सुचवले आहे.
एकमेकांनी दिनचर्या शेअर करावी, पॉझिटिव्ह गोष्टींवर चर्चा करावी
मोबाईल, लॅपटॉप व टीव्हीपासून दूर राहा
लक्षात ठेवा, शारीरिक निकटता मजबूत नात्यासाठी खूप गरजेची आहे.
एकमेकांविषयी सुंदर व सकारात्मक गोष्टी बोला.
एकमेकांच्या अवगुणांवर चर्चा करू नये.
गंभीर कौटुंबिक वा राजकीय मुद्द्यांवर चर्चा करू नका.
ड्रिंक करून वा स्मोक केल्यावर बेडवर जाऊ नये.
------------------------

