निपाणी : बुधवार दिनांक 30/10/2024 रोजी निपाणी नगरपालिकेने 4 जे आर ह्यूमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन ने केलेल्या तक्रारीची दखल घेत मिरची बाजार व परिसर स्वच्छतेस सुरवात केली आहे ,त्यामुळे परिसरातील नागरिक व येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना मधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच या पुढे येथील स्वच्छता आबादीत ठेवावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.
तसेच दत्त खुले नाट्यगृहाच्या खुदाई केलेल्या जागे मधील पाणी बाहेर सोडून स्वच्छता केली जात असून ही स्वच्छता एक प्रकारे तात्पुरतीच असून या वर देखील कायम स्वरूपी काहीतरी उपाय योजना करावी तसेच मिरची बाजार परिसरात चिकन व्यवसाय करणारे काही नागरिक तसेच सलून, फळ विक्रेते व स्थानिकांच्या कडून येथे कचरा टाकण्यात येत असून कचरा टाकणाऱ्या वर योग्य कार्यवाही करण्यात यावी असेही नागरिकांचे कडून व 4 जे आर ह्यूमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन कडून सांगण्यात आले.
यावेळी 4 जे आर ह्यूमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी अशोक खांडेकर, सचिन पवार, योगेश कांबळे, युवराज शेटके, संतोष मावणकर उपस्तिथ होते.
----------------------------


