पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना विरेंद्र मंडलिक यांचा विरोध तर संजय मंडलिक यांचा पाठिंबा ; वडील आणि मुलग्यात मतभेद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

Kolhapur news
By -

 

        


               कोल्हापूर न्यूज नेटवर्क


मंगळवारी वीरेंद्र मंडलिक यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यामध्ये आपण कागल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आता थांबावे आणि आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन ही केले.पण विरेंद्र मंडलिक यांचे वडील आणि माजी खासदार संजय मंडलिक यांनी कागल  सांगाव येथून जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना मदत करण्याचे आवाहन केले .  यामुळे मुलगा  आणि वडिलांच्या मध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


पालकमंत्री हसन मुश्रीफ  यांच्या सांगाव मधील कार्यक्रमांमध्ये  माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह जिल्ह्यातील अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती. या मेळाव्यात मंडलिक यांनी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार यावे व त्यात हसन मुश्रीफ असावेत अशी इच्छा व्यक्त केली. एवढेच नाही तर त्यांनी अत्यंत ताकदीने मुश्रीफ यांना मदत करा, असे आवाहनही केले. यामुळे ते हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे ताकदीने उभे असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे वडील पालकमंत्र्यांच्या बाजूने तर मुलगा  पालकमंत्र्यांच्या विरोधात अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

   माजी खासदार संजय मंडलिक यांच्या कुटुंबातील मतभेद समोर आले असल्याने महायुती समोरच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून कागल विधानसभा मतदारसंघ सतत चर्चेत आहे. समरजीत घाटगे यांनी तुतारी फुंकल्यापासून तर ही लढत हायव्होल्टेज झाली असून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे आहे. 

त्यामुळे आता या वादामध्ये वीरेंद्र मंडलिक यांची समजूत कोणत्या पद्धतीने काढली जाणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

  यापूर्वीच या मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून जाहीर ही करण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. कागलकरांनी निवडून दिल्यास त्यांना मंत्रीपदाचे सुतोवाचही शरद पवार यांनी कागलमध्ये मेळाव्यामध्ये केले आहे. त्यामुळे कागलच्या रणांगणामध्ये आता चांगलाच राजकीय  रंग भरला आहे.

--------------------------------------------