मुरगूड शहरातील जवाहर रोडवरील रस्त्याच्या पॅचवर्कला नागरिकांचा विरोध ! आंदोलनाचा इशारा

Kolhapur news
By -

 

           




              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    मुरगूड शहरातून तुकाराम चौक ते जवाहर रोड पर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्कचे (खड्डे मुजविण्याचे काम ) कामास स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध करीत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण ताबडतोब करण्याची मागणी केली . अन्यथा लवकरच  रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

       

      येथील  कापशी रोडसी जोडल्या गेलेल्या व मुरगूड निपाणी सी समांतर  हुतात्मा तुकाराम चौक ते जवाहर रोड या रस्त्याचे दोन वर्षापासून डांबरीकरण रखडले आहे . शहरातील वाहतूकीची वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत  अनेकवेळा या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी आंदोलनाचे इशारे देण्यात आले . त्याची दखल न घेता आता सार्वजनिक बांधकाम विभागाने  निधीची तरतूद नाही असे दाखवून पॅच वर्क (खड्डे मुजविण्याचे  काम ) सुरु केले आहे . ही मलमपट्टी नको  अशी मागणी करीत स्थानिक नागरिकांनी काम बंद आंदोलन केले .

           

        या रस्त्याचे ताबडतोब डांबरीकरण न झाल्यास  नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे संबंधितांना दिला आहे . निवेदन देणाऱ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट ' संजय सुर्यवंशी ' किशोर पोतदार तानाजी भराडे' जगदीश गुरव आदि प्रमुख नागरिकांचा समावेश होता . 


    पॅच वर्क कामास विरोध करून आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन देताना नागरिक

         
                 ------------------------