कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हजारो वर्षांपूर्वीची तथागत भगवान बुद्ध यांच्या काळी अस्तित्वात असलेली "पाली भाषा" तसेच काही कालावधी पूर्वी मराठी भाषेबरोबरच ज्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे या "पाली" भाषेची सर्वसामान्य जनतेला, विद्यार्थ्यांना, तरुण-तरुणींना, गोडी लागावी.तसेच या भाषेचे जतन व संवर्धन व्हावे या उद्देशाने नानीबाई चिखली येथील बौद्ध विहारामध्ये पाली भाषेत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर परीक्षेत 12 परीक्षार्थीनी सहभाग नोंदवला. सदर परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर सकाळी 9.00 वा.सुरुवातीस समाजातील तरुण व बालवर्गाने विहार स्वच्छता उपक्रम राबवला . त्यानंतर सर्व मान्यवरांच्या सोबतच परीक्षार्थीनीही त्रिशरण पंचशील, बुद्ध वंदना घेऊन परीक्षा सुरू करण्यात आली.याप्रसंगी समाजातील सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी या उपक्रमास सहकार्य करून परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या तसेच पालीभाषा जतन व संवर्धन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा संकल्प केला.
------------------------------------




