कोल्हापूर न्यूज नेटवर्क
शिक्षण विभाग (प्राथमिक),जिल्हा परिषद, कोल्हापूर व माण देशी फौन्डेशन,म्हसवड, ता.माण जि.सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील भुदरगड,कागल,करवीर,पन्हाळा,
हातकांणगले व कोल्हापूर महानगरपालिकेकडील उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकाना निवासी क्रीडा प्रशिक्षण दि.16/12/2024 ते दि.20/12/2024 अखेर सिवार्चल,कणेरी मठ ता.करवीर येथे पाच दिवसाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मा.आर.व्ही.कांबळे,शिक्षण विस्तार अधिकारी प्राथमिक तथा प्रशासनाधिकारी कोल्हापूर महानगरपालिका यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विचार व्यक्त केले.
मा.आर.व्ही.कांबळे, यांचा प्रशिक्षणार्थीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा चरित्रग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .“मा.कांबळे यांनी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची ओळख करून दिली.आदर्श व्यक्तिमत्व विकासात विविध क्रीडा प्रकारांचे व क्रीडा शिक्षकाचे अनन्य साधारण महत्व विशद केले.जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांचे योगदान व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचे देखील कौतुक केले.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन हेच विद्यार्थी राष्ट्र उभारणीसाठी सक्षम बनविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करायचे आहे.आपल्या जीवनातील प्राथमिक शिक्षकांचं स्थान व या शिक्षकांमुळे स्वतःच्या जीवनातील आमूलाग्र बदल याबाबत आठवणी सांगून करुन शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला.
मा कार्तिकेयन एस.मुख्यकार्यकारी कोल्हापूर यांनी शिक्षक व शाळांच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हाती घेतलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देऊन,साहेबांच्या वतीने शुभेच्छा संदेश देण्यात आल्या.
मा मीना शेंडकर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या वतीने शिक्षकांचे स्वास्थ्य व शाळाविकासाच्या दृष्टीकोनातून राबवलेले उपक्रमांची माहिती दिली.भविष्य काळातील आवश्यक ते सहकार्य शिक्षकांना व शाळांना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.यावेळी शेंडकर यांच्या वतीने प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा देण्यात आल्या.
माण देशी फौन्डेशन,म्हसवड, ता.माण जि.सातारा चे संचालक मा ओंकार गोंजारी यांनी जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. क्रीडाशिक्षकांनी आपल्या कौशल्यांच्या जोरावर राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवणारे आदर्श खेळाडू तयार करावेत, यासाठी मानदेशी फाऊंडेशन आपल्या पाठीशी कायम राहील असे आश्वासन दिले.प्रशिक्षणात सहभागी झालेल्या महिला व शिक्षकांचा प्रशिक्षणातील उत्साही सहभाग व सादरीकरणबद्दल सर्व प्रशिक्षणार्थींचे कौतुकही केले.आपण आपली निवड सार्थ करून दाखविल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.याचा लाभ शाळेतील मुलीना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
सदर प्रशिक्षणा अंतर्गत सलग पाच दिवस निवासी प्रशिक्षणाअंतर्गत शिक्षकाना कबड्डी,खोखो ,पोषणमूल्य युक्त आहार,ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,पोक्सो कायदा, सामाजिक जाणीव व खेळातून विकास,भारताचा इतिहास व राजकीय,सांस्कृतिक,व्यापार विकासात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या राजघराण्याचे अमुल्य योगदान, NIS कोच मार्फत विविध खेळांचे नियम,हातखंडे व प्रात्यक्षिक घेण्यात आले.
या प्रशिक्षण कालावधीत मा.मीना शेंडकर शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांनी शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी 34 प्रशिक्षणार्थीनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी व माणुसकी धर्म जपला.
प्रशिक्षण काळात क्रीडा प्रशिक्षक म्हणून कामगिरी पार पाडलेल्या मा प्रभात सिन्हा,संस्थापक अध्यक्ष माण देशी फौन्डेशन,मा ओमकार गोंजारी,संचालक,मा हणमंत घोरपडे,जेष्ठ प्रशिक्षक कब्बडी व खो-खो,मा श्रीराम बाबर,जेष्ठ प्रशिक्षक ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,मा प्रविण फोगेरी,जेष्ठ प्रशिक्षक ऍथलेटिक्स ट्रॅक आणि फील्ड,मा अनुराग शिंदे ,इतिहास अभ्यासक,मा हणमंत गायकवाड,समन्वयक,मा सुशांत आवळे,समन्वयक,मा चिदंबर चित्रगार समन्वयक,यांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर गट सादरीकरण स्पर्धेत प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थींना मा आर व्ही कांबळे व माण देशी फौन्डेशन यांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आले.
समारोप कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मा आर.व्ही. कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी,मा बाळासाहेब कांबळे,शिक्षण निरीक्षक महानगरपालिका,मा रावसाहेब पाटील,मा सचिन पांडव सर यांचा प्रशिक्षणार्थीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण काळातील आपले अनुभव प्रशिक्षणार्थी मा.संतोष डवरी भुदरगड व मा.शबाना अपराध,पन्हाळा यांनी आपले मनोगत व अनुभव व्यक्त केले.प्रशिक्षण यशस्वी पूर्ण करण्यासाठी काम करणारे मा.ओंकार गोंजारी संचालक ,सर्व व्यवस्थापक माण देशी फौन्डेशन,व्यवस्थापक चिदंबर चित्रगार,बाजीराव कांबळे,मा.प्रल्हाद जाधव सर,प्रमुख विद्या चेतना, कणेरी मठ, मा.राजेंद्र शिंदे सर व व्यवस्थापक टीम,परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वरस्वामी कणेरी मठ व काडसिद्धेश्वर हायस्कूल क्रीडा शिक्षक व व्यवस्थापक, या सर्व शिक्षकांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविक बाबू गवंडी करवीर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी तानाजी पोवार हातकंणगले( शिरोळ ) यांनी केले.तर मा कार्तिकेयन एस मुख्यकार्यकारी अधिकारी,मा मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी, कोल्हापूर,माण देशी फौन्डेशन चे अध्यक्ष प्रभात सिन्हा,संचालक ओंकार गोंजारी,सर्व मार्गदर्शक व व्यवस्थापक यांच्यासह, परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वरस्वामी कणेरी मठ व काडसिद्धेश्वर हायस्कूल, जिल्हा प्रशासन व सहभागी सर्व शिक्षक बंधू भगिनीचे आभार प्रशिक्षणार्थी मुरलीधर पाटील,करवीर यांनी मानले.
-----------------------------------






