कोजिमाशि' च्या चेअरमनपदी राजाराम शिंदे तर व्हाईस चेअरमनपदी शरद तावदारे यांची बिनविरोध निवड

Kolhapur news
By -

 

               

                                  चेअरमन
          
                        व्हा. चेअरमन

                    

                         कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी. राजाराम आनंदा शिंदे(प.पू.शामराव महाराज ज्ञानयोग हायस्कूल माजगाव ता.पन्हाळा ) यांची तर व्हाईस चेअरमनपदी शरद धोंडीराम तावदारे (सानेगुरुजी हायस्कूल कुरुंदवाड   ता. शिरोळ) यांची संचालक मंडळाच्या बैठकित बिनविरोध निवड करण्यात आली . या निवडी शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या .बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी उदय उलपे होते . 


    निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण केली .निवड प्रक्रियेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे यांनी केले .शाहुुपुरी येथील मुख्य कार्यालयात झालेल्या या बैठकित चेअरमनपदासाठी  राजाराम शिंदे व व्हाईस चेअरमनपदासाठी शरद तावदारे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी  उदय उलपे यांनी या निवडी बिनविरोध झाल्याचे घोषित केले . चेअरमन पदासाठी राजाराम शिंदे यांचे नाव संचालक डॉ दत्तात्रय घुगरे यांनी सुचविले व त्यास राजेंद्र रानमाळे यांनी अनुमोदन दिले तर व्हाईस चेअरमन पदासाठी शरद तावदारे यांचे नाव संचालक उत्तम पाटील यांनी सुचविले . व त्यास अनुमोदन अनिल चव्हाण यांनी दिले

           

 यावेळी संचालक बाळ डेळेकर,  राजेंद्र रानमाळे , अनिल चव्हाण , मदन निकम, श्रीकांत कदम, श्रीकांत पाटील  , सुभाष खामकर , अविनाश चौगले , दिपक पाटील , राजेंद्र पाटील  , जितेंद्र म्हैशाळे ,प्रकाश कोकाटे, पांडुरंग हळदकर , मनोहर पाटील , सचिन शिंदे  , सौ .ऋतुजा पाटील , शितल हिरेमठ आदीसह उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे , संगणक अधिकारी नितीन शिंदे उपस्थित होते 

           

    निवडीनंतर नुतन चेअरमन , व्हाईस चेअरमन यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला . सभासदांनी ' स्वाभिमानी सहकार ' आघाडीवर विश्वास ठेवून चौथ्यांदा एकहाती सत्ता दिली . त्यामुळे सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेऊन दिलेल्या वचननाम्याची वचनपुर्ती टप्याटप्याने केली जाईल अशी ग्वाही आघाडीप्रमुख दादासाहेब लाड यांनी यावेळी  दिली . 

        

   आघाडीचे नेते दादासाहेब लाड यांनी आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेऊन काटकसरीचा व आदर्शवत असा पारदर्शी कारभार केला जाईल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना चेअरमन राजाराम शिंदे व व्हाईस चेअरमन शरद तावदारे यांनी केले .


          -------------------------------------