मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Kolhapur news
By -

 

         


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख (शिंदे गट) एकनाथ शिंदे यांच्या वयाच्या ६० व्या हिरकमहोत्सवी वर्षा निमित्त मुरगूड येथे सोमवार दि.२० /०१/२०२५ रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत भव्य आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

     मुरगूड च्या ग्रामीण रुग्णालय परिसरात भरणाऱ्या या शिबिराचे उद्घाटन संताजी शुगर चे अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून अध्यक्ष स्थान रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.भगवान डवरी भूषविणार आहेत.

   शिबिरात हृदयविकार, मुत्ररोग,नेत्ररोग,पोटविकार ,त्वचा रोग , अस्थी रोग असे विविध विभाग असतील.कोल्हापूर येथील एशियन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,स्वस्तिक हॉस्पिटल,ग्रामीण रुग्णालय मुरगूड, नंदादीपआय हॉस्पिटल यांचा मोलाचा सहभाग रहाणार आहे.

      डॉ. वसिम मुल्ला, डॉ.शिवाजी घुगरे, डॉ.अनिल पाटील,डॉ.महेश वालावलकर,डॉ.सुरेश पाटील,डॉ.निनाद पाटील,डॉ. गुरुकृष्ण के,डॉ.हर्षवर्धन पोखरकर,डॉ.विनायक तावडे यांची प्रमुख उपस्थिती रहाणार आहे.

    संपूर्णपणे मोफत असणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले असून त्यासाठी नाव नोंदणी आवशक आहे असल्याचे म्हंटले आहे.

    विशेष असे की जिल्ह्याला ना.हसन मुश्रीफ, (वैद्यकीय शिक्षण) व ना.प्रकाश आबिटकर (सार्वजनिक आरोग्य) असे दोन कॅबिनेट मंत्री लाभले आहेत.हे दोन्ही मंत्री राज्याच्या आरोग्य रक्षणाशी निगडित आहेत.

     शिबिराच्या आयोजनात माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार ,विशाल सूर्यवंशी,अमर संणगर,राहुल घोडके,राजू भारमल,राजू महाजन, दत्ता हासबे यांचा पुढाकार आहे.


     --------------------------------------