निपाणी : निपाणी परिसरात नगरपालिका मालकीच्या रिकाम्या जमिनी आहेत. पण त्या सध्या पूर्णतः रिकाम्याच आहेत की , कोणी अधिगृहीत केलेल्या आहेत अशा अनेक शंका निपाणी शहरातील नागरिकांच्या मनात निर्माण होत असून या शंकेचे निराकरण करण्यासाठी निपाणी शहरातील सर्व जमिनींची मोजणी करून निपाणी नगरपरिषदेच्या मालकीची किती जमीन आहे व त्या सर्व सुस्थितीत आहेत की नाही याची खातरजमा होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या मालकीच्या किती जमीनी आहेत आणि कुठे आहेत, हे नागरिकांना कळू शकेल.
असे केल्याने सध्या चर्चेत असलेले इंदिरा कँटीनही या एकाच ठिकाणी बांधता येणार आहे . जेणेकरून ही बागेची जागा फक्त बागेपुरतीच राहील. या उद्यानाचा उपयोग नागरिक बसण्यासाठी, वृद्धांना निसर्गाच्या सानिध्यात दिवस घालवण्यासाठी आणि लहान मुले खेळ खेळण्यासाठी करतात. सध्याच्या परिस्थितीत नागरिकही याचा आनंद घेऊ शकतात म्हणून उद्यान अबाधित ठेवावे आणि इंदिरा कॅन्टीन इतरत्र बांधावे आणि नगरपालिकेच्या सर्व जमिनी संपादित कराव्यात अशी मागणी 4 JR ह्युमन राइट्स केअर ऑर्गनायझेशनच्या वतीने निपाणी नगरपालिकेकडे करण्यात आली आहे.
-------------------------------------

