कागल शहरातील नव्याने विकसित होणाऱ्या उपनगरांचा सर्वांगीण विकास करणार - नामदार हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

     



    

                कोल्हापूर न्यूज नेटवर्क


   कागल शहराचा सर्वांगीण विकास हाच ध्यास ठेवून आजपर्यंत नेत्रदीपक विकास केला आहे. कागल शहराच्या उपनगरी भागात नव्याने विकसित होत असणाऱ्या उपनगरांचा ही सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे  प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले . 


        कागल मधील  स्वराज्य पार्क येथील विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते  . २०लाख ५६ हजार इतक्या रकमेच्या कामांचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.   


  यावेळी त्यांनी उद्योजक श्री राम रानगे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली . याप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने , गोकुळचे संचालक युवराजबापू पाटील , प्रकाश गाडेकर , प्रवीण काळबर ,नगरसेवक सतीश घाटगे, प्रकाश तिराळे ,नेते जमीर जमादार ,संदीप शितोळे आदी उपस्थित होते . 






         --------------------------------------------