कोल्हापूर न्यूज नेटवर्क
भारतीय राज्यघटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त गावातील पंचशील नगर मध्ये असलेली जिल्हा परिषदेची "डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर चिखली" या शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प शाळा व्यवस्थापन, समिती शाळा बचाव समिती यांच्या माध्यमातून करण्यात आला. सदर उपक्रमाला गावातील समस्त गावकऱ्यांबरोबरच पंचशील नगर, अण्णाभाऊ साठे नगर ,बौद्ध नगर ,मुरगडे अड्डा ,चौगुले अड्डा, गावची ग्रामपंचायत माध्यमातून तसेच संपूर्ण गावातील दानशूर व्यक्तींकडून हजारो रुपयांच्या मदतीचा ओघ सुरू आहे.
सदर उपक्रमामध्ये विद्यालयाने आज अखेर केलेली कामे खालीलप्रमाणे...
1)प्रशालेचे थकीत लाईट बिल 12,280/ वीज मंडळाचे भरून प्रशालेची लाईट व्यवस्था केली.
2) बोलक्या भिंती उपक्रम -प्रशालेची रंगरंगोटी करून प्रशालेच्या भिंतीवरती शैक्षणिक चित्रे, गणितीय ,वैज्ञानिक माहिती लिहून शाळा देखणी बनवली
3) प्रशालेच्या नावाचा 16,000 किमतीचा आकर्षक ॲक्रेलिक बोर्ड बनवला
4) प्रशालेमध्ये बगीचा प्रशालेला बगीचा तयार करण्यासाठी माती उपलब्ध करून घेतली
5) शाळेमध्ये सीसीटीव्ही बसवलेत
शाळा बचाव समिती व शाळा व्यवस्थापन समिती यांचे शाळेविषयीचे भविष्यकालीन उपक्रम...
1. प्रशालेमध्ये सुसज्ज ग्रंथालय बनवणे
2. प्रशालेतील मुलांसाठी क्रीडांगण बनवून मुलांना क्रीडा साहित्य पुरवणे
3 प्रशालेमध्ये वाचन कट्टे बनवणे विज्ञान प्रयोगशाळा बनवणे
4. विद्यालयामध्ये कला सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी कला रंगमंच तयार करणे
शाळा बचाव समिती, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिर, पंचशील नगर चिखली या प्रशालेचा कायापालट प्रगतीपथावर आहे.
भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त 26 जानेवारी रोजी विद्यालयाने संविधानाचे महत्त्व सांगणारा "संविधान चित्ररथ" बनवून शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावामध्ये प्रभात फेरी काढली.
--------------------------------


