मुरगूड नगरपरिषदेचे कर्मचारी व शिवभक्तांनी जीवावर बेतून केली टाक्यांची स्वच्छता.

Kolhapur news
By -

 

           


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क


      पावसाळ्यानंतर तलावातील पाण्याचा साठा कमि होईल तसे दूषित व गढूळ पाणी येऊ लागते.मुरगूड नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडील टाक्या स्वच्छ करण्याची वेळ आली.

    तीस फूट उंचीवरील टाक्या स्वच्छ करणे हे आव्हानात्मक काम होते.कुशल कामगारांना स्वच्छतेचे कंत्राट देण्याची पद्धत असते . ती फार खर्चिक असते.

      त्यामुळे कांहीं शिवभक्त स्वयंसेवकांना सोबत घेऊन व जीवावर बेतुन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टाक्यांच्या सफाईचे काम केले.

      कसलाही मोबदला न घेता कर्मचारी व स्वयंसेवकांनी केलेल्या या सेवेचे कौतुक होत आहे. नागरिकांनी  पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहनही  करण्यात आले आहे.



     


    ---------------------------------------------