कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग,ग्रंथालय संचनालय,महाराष्ट्र राज्य, मुंबई.यांचे अधिपत्याखालील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,कोल्हापूर यांच्यावतीने दोन दिवस कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव २०२४ चे आयोजन गुरुवार व शुक्रवार दि.६ व ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत इचलकरंजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन,कापड मार्केट समोर,थोरात चौक येथे करण्यात आले आहे.
या ग्रंथोत्सवात दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर ग्रंथोत्सवासाठी जिल्ह्यातील मंत्रिमहोदय,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महोदय,लोक सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.तसेच जिल्ह्यातील शासकीय अधिकारी,कर्मचारी,अनेक मान्यवर पदाधिकारी, सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी,कर्मचारी, इचलकरंजी शहरातील शाळा,महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच इतर नागरिक स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या ग्रंथोत्सवात गुरुवार व शुक्रवार दि.६ व ७ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवसाच्या कालावधीत सकाळी १०.०० दहा ते रात्री ८.०० या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल तसेच ग्रंथालयाशी संबंधित सॉफ्टवेअर कंपन्या,ग्रंथालयाशी संबंधित फर्निचर विक्रेते यांचेही स्टॉल लावण्यात येणार आहेत.इच्छुकांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,२०७८,आकाशगंगा अपार्टमेंटसमोर, राजारामपुरी,११वी गल्ली,कोल्हापूर.येथे लेखी पत्रासह दि.२८-०१-२०२५ पर्यंत संपर्क साधावा .ग्रंथोत्सवमध्ये जास्तीत जास्त प्रकाशक,ग्रंथविक्रेते, ग्रंथालयाशी संबंधित विकसित केलेले सॉफ्टवेअर कंपन्या,फर्निचर विक्रेते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन ग्रंथोत्सव २०२४ च्या सदस्य सचिव श्रीमती अपर्णा वाईकर यांनी केले आहे.
---------------------------------------

