कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पुणे येथे झालेल्या हिंदू गर्जना केसरी किताबाचा मान मुरगूड च्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक (साई) आखाड्याची अपेक्षा पाटील हिने पटकावला.
सृष्टी भोसलेवर ८:०२ अशी मात करून अंतिम फेरीत तिने पुण्याच्या प्रगति गायकवाड आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती चॅम्पियन वर मात केली.त्यामुळे अपेक्षाचे विशेष कौतुक होत आहे.
कोल्हापूरच्या सहपालक मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.यावेळी अभिनेते पुनीत बालन,अंकुश चौधरी , उद्योगपती धीरज घाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
------------------------------------


