रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये मुरगूड विद्यालयाचा यश दबडे रौप्य पदकाचा मानकरी.

Kolhapur news
By -

 

                


                   कोल्हापूर न्यूज नेटवर्क


        इंड्युरन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2024- 25 अंतर्गत मुंबई येथील याक पब्लिक स्कूल खोपोली येथे संपन्न झालेल्या स्केटिंग स्पर्धेत मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड मधील यश शशिकांत दबडे याने 14 वर्षाखालील वयोगटात रोलर स्केटिंग मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला 200 मीटर अंतर 20 सेकंदात पूर्ण करून त्याने द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला व रौप्य पदक पटकावले. तर एक किलोमीटर अंतर दोन मिनिटांमध्ये पूर्ण करून त्याने तृतीय क्रमांक पटकावला व कांस्यपदक पटकावले. आतापर्यंत स्केटिंग स्पर्धेमध्ये यश दबडे यांनी 31 मेडल प्राप्त केले आहेत. 


    शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाई अध्यक्षा शिवानी ताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत चेअरमन डॉ. मंजिरी मोरे देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेते दौलतराव देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे कोजिमाशीचे ज्येष्ठ संचालक बाळ डेळकर, शालेय समिती चेअरमन प्रवीणसिंह पाटील यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य एस पी पाटील उपप्राचार्य एस .बी. सूर्यवंशी, एम.डी खाटांगळे, पर्यवेक्षक एस डी साठे,प्रा.सुरेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.


          -------------------------------------