कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विकी कौशल आणि रश्मिका मानधना अभिनित छावा चित्रपट मुरगूड मध्ये दाखल झाला.त्याचे शहरात जोरदार स्वागत झाले.
शिवभक्त आणि हिंदुत्ववादी संघटनांनी फटाक्यांची आतषबाजी केली.
सोशल मीडियावर सुध्दा या चित्रपटाने मोठा प्रभाव पाडल्याचे दिसत आहे.
हा चित्रपट शिवपुत्र संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.संभाजी राजांचे अतुलनीय शोर्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी दिलेले स्वतःच्या प्राणांचे बलिदान याला इतिहासात तोड नाही.
त्यांच्या स्फुर्तिदायक इतिहासाचे वर्णन करताना शब्दांचे अंगार फुलत जातात.तरुणांच्या सर्वांगावर रोमांच उभे राहतात , ज्येष्ठांचे डोळे विस्फारतात , पोरं भगवे झेंडे घेऊन नाचू लागतात.कवी आणि वक्त्यांनाही स्फुरण चढतं.
संभाजी राजे कोणाला म्हणायचे ?
इंग्रज, डच आणि फ्रेंच या आक्रमकांचा कर्दनकाळ म्हणजे संभाजी राजे.
अतुलनीय संयमाची गाठ आणि सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे संभाजी राजे .
आम्हां मराठ्यांना ज्यांनी आणली हिंदुत्वाची जाग ते म्हणजे संभाजी राजे.
अशा स्फूर्तिदायक काव्य पक्तींचे कारंजे उडतांना दिसत होते.
प्रदर्शनापूर्वीच पाच कोटींचा अडव्हांस बुकिंग व्यवसाय या चित्रपटाने केल्याची चर्चा सुध्दा जोरात होती.
एकंदरीत छावा चित्रपट देशभर स्फूर्ती आणि प्रेरणा यांची लाट निर्माण करू शकेल असे चित्र दिसते.
-----------------------------------------------

