पाटबंधारे विभागाचा आंधळा कारभार : शेतकऱ्यांच्याकडे पाणीपट्टी भरलेली पावती नाही पण पाटबंधारे विभागाकडे ही त्याची नोंद नाही

Kolhapur news
By -

            


                 कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     मागील वर्षी पाणीपट्टी भरूनही परत यावर्षी पाणीपट्टीची नोटीस शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाकडून दिली जात असल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या या आंधळ्या कारभाराबद्दल शेतकऱ्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

     

    सन २०२१ साला पूर्वीच्या पावत्याही दाखवण्याचा तगादा लावला जात आहे . शेतकऱ्यांच्याकडे या पाणीपट्टी भरलेल्या पावत्या उपलब्ध असतीलच असे नाही. कारण प्रत्येक शेतकरी पावती जपून ठेवीलच असे नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्याकडे पावत्या उपलब्ध नसतात . पण शेतकऱ्यांच्याकडे पावती नाही तर आमच्या रेकॉर्डनुसार तुमच्याकडे येणे बाकी आहे असे दाखवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे ही तसे रेकॉर्ड उपलब्ध नाही. शेतकऱ्यांच्याकडे पावती नाही आणि पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी न भरल्याचे रेकॉर्ड उपलब्ध नाही , त्यामुळे पाणीपट्टी वसुली कोणत्या आधारे करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे पाणीपट्टी भरलेली आहे पण आज त्यांच्याकडे पाच वर्षांपूर्वीची पावती उपलब्ध नाही त्यांना पाणीपुट्टी भरूनही मनस्ताप सहन करावा लागत आहे . 

  --------------------------------------------------


       पाटबंधारे विभागाने रेकॉर्ड ऑनलाइन करावे

          

            सध्या सर्वच कार्यालयात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे , असे असताना पाटबंधारे विभागाकडे मात्र पाणीपट्टी संदर्भात तशी कोणतीही  संगणीकृत नोंद केली जात नाही. त्यामुळे पाटबंधारे विभाग कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्यात वादाचे प्रसंग उद्भवतात , म्हणून पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुली ऑनलाईन करावी जेणेकरून जुने रेकॉर्ड ही सहज उपलब्ध होईल. 

                        - श्रीशैल नुल्ले

                           शेतकरी 

  ----------------------------------------------------